03/10/2025
सण-उत्सवाच्या काळात आणि दैनंदिन व्यवहारांत इंदापूर आणि माणगांव शहरांमध्ये होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, आज राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ अंतर्गत इंदापूर बायपास आणि माणगांव बायपास रस्त्यांचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले!
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांनी सातत्याने प्रयत्नशील भूमिका बजावली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भातील निर्णायक बैठका पार पडल्या. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे आणि लवकरच तो पूर्णत्वास जाईल, तसेच बायपास रस्त्यांमुळे वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल असे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले...